
BMW Car Accident: मुंबईत बोरिवली पश्चिममध्ये बीएमडब्ल्यू कार चालक स्टंट करताना नियंत्रण सुटल्यानं स्कुटीला धडक बसली. स्कुटीवरून जात असलेल्या तरुण तरुणीला यात गंभीर दुखापत झाली आहे. स्कुटीला धडक दिल्यानंतर बीएमडब्ल्यू कारचाही अपघात झाला. कार तारांचे कंपाउंड तोडून थेट रस्त्याच्या कडेला घसरली. या घटनेचे फोटो व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.