बदलापूर : बदलापुरात बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात BMW कारचा चक्काचूर झाला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे. .मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-वडोदरा मार्गावर मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. टिटवाळ्याहून बदलापूरच्या दिशेने येत असणाऱ्या भरधाव बीएमडब्ल्यू कार चालकाचे एरंजाडजवळ येताच गाडीवरील नियंत्रण सुटले. या गाडीचा वेग ताशी तब्बल २५१ किलोमीटर असल्यामुळे मध्यरात्रीच्या अंधारात रस्त्याचा आणि वेगाचा अंदाज न आल्यामुळे ही कार दुभाजकावर आदळून पलटी झाली. ज्यामध्ये कारचा पूर्णपणे चुराडा झाला..Mumbai News: मुंबई पालिकेचा कर रेकॉर्ड सुधारणार, ५४ डेटा एंट्री ऑपरेटर नेमणार, ३० लाखांचा खर्च; प्रशासनाचा मोठा निर्णय.दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओ समाजमाध्यमावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अपघातापूर्वी गाडीचा वेग ताशी २५१ किलोमीटर असल्याचे दिसत आहे. मध्यरात्री गाडीचा वेग मर्यादेबाहेर असल्यामुळे BMW कारचा भीषण अपघात घडला. गाडीच्या इंजिनचे तुकडे झाले असून, हायवेवर सर्वत्र गाडीचे अवशेष विखुरलेले गेले..बदलापूरमधील या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली असून मृतदेहांचे अवयव अर्धा किलोमीटरपर्यंत विखुरले गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाले. मरण पावलेल्या व्यक्ती बदलापूर येथील असून सध्या त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे..Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.