दहावी- बारावीच्या परीक्षा 'याच' पद्धतीनं, शिक्षण मंडळाचं मोलाचं आवाहन

संजीव भागवत
Tuesday, 23 February 2021

अफवांवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी विश्वास ठेवू नये. दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा या ऑफलाईन घेण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे.

मुंबई:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल महिन्यात घेण्यात येत असलेल्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा या ऑफलाईन घेण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यामध्ये तूर्तास कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे या संदर्भात सुरू असलेल्या अफवांवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्या ऑनलाइन घेतल्या जातील, अशी अफवा काही सोशल मीडियावर सुरू असून त्यात कोणतंही तथ्य असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) दिनकर पाटील यांनी दिली.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्य शिक्षण मंडळाने मागील आठवड्यापूर्वीच दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात दहावीची लेखी परीक्षा ही 29 एप्रिल ते बारावीची लेखी परीक्षा ही 23 एप्रिल रोजी सुरू होणार आहे.

हेही वाचा-  मुंबईत तस्करीसाठी आणलेली हरणाची शिंगे जप्त, कुर्ल्यातून आरोपी अटकेत

शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या या दहावी-बारावीच्या या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. मात्र राज्यात येत्या काळात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन त्याविषयी आवश्यक वाटल्यास मंडळाकडून निर्णय घेतला जाईल. मात्र तूर्तास जाहीर केलेल्या वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे नियोजित वेळेतच या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील असेही पाटील यांनी सांगितले.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Board decided conduct written examinations Class 10th and 12th offline


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Board decided conduct written examinations Class 10th and 12th offline