
लॉकडाऊन उठवण्याच्या संदर्भात एक प्रोटोकॉल असतो. त्या कार्यपध्दतीनेच लॉकडाऊन उठवला जाऊ शकतो.
मुंबई - महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना पाहायला मिळतेय. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे. अशात नागरिकांचं लक्ष कोरोनाचा संसर्ग कधी संपणार आणि एकदाचा हा लॉकडाऊन पिरिअड कधी संपणार यावर आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक मोठं विधान केलंय. १५ एप्रिलनंतर महाराष्ट्रात सरसकट लॉकडाऊन उठणार असं कुणीही गृहीत धरू नये, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणालेत.
मोठी बातमी - धारावीकरांनो सावधान! ही धक्कादायक बातमी आली समोर..
राजेश टोपे यांना महाराष्ट्रात १४ एप्रिलनंतर कशा प्रकारे लॉकडाऊन उठवणार याबाबत विचारलं गेलं. यावेळी राजेश टोपे म्हणालेत, १० एप्रिल नंतर लॉकडाऊन उठवायचा का या प्रक्रियेवर चर्चेला सुरवात होणार आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा मृत्युदर जास्त आहे. अशात दिवसागणिक महाराष्ट्र आणि मुख्यत्वे मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये रोज वाढ देखील होतेय, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे सरकारसाठी महाराष्ट्रात कोरोना लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेणं अडचणीचं झालंय. दरम्यान महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी वाढणार याचे स्पष्ट संकेत राजेश टोपे यांनी दिलेत.
मोठी बातमी - लॉकडाऊनचा थेट 'मोठा' परिणाम होतोय महिलांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर...
काय म्हणालेत आरोग्यमंत्री राजेश टोपे :
लॉकडाऊन उठवण्याच्या संदर्भात एक प्रोटोकॉल असतो. त्या कार्यपध्दतीनेच लॉकडाऊन उठवला जाऊ शकतो. अशात लॉकडाऊन पूर्ण उठवायचा की टप्प्याटप्प्याने उठवायचा या संदर्भातील काही देशांच्या केस स्टडी आपल्याजवळ आहेत. याबाबत याबाबत केंद्र सरकार अभ्यास करून आम्हाला माहिती पाठवतंय. त्या अनुषंगाने निर्णय घेतले जातायत असं राजेश टोपे म्हणालेत. त्यामुळे १५ एप्रिलनंतर महाराष्ट्रात सरसकट लॉकडाऊन उठणार असं कुणीही गृहीत धरू नये, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणालेत.
health minister rajesh tope on maharashtras lockdown and measures after 14th april