डेथ सर्टीफिकेटसह पाठवलेला मृतदेह अर्ध्या रस्त्यातच झाला जिवंत आणि...

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 31 मे 2020

त्या बॅगमध्ये हलचाल दिसून येत आहे. बॅममधील व्यक्ती जिवंत होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारानंतर प्रकृती सुधारु लागते. आणि चार ते पाच तासानंतर त्यांचे खरोखर निधन होते.

अलिबाग: निधन झाल्याची बातमी गावात येते, शोकाकुल नातेवाईकांना आपले दुःख आवरता येत नाही... सर्व तयारी सुरु होते. आणि अॅम्बुलन्स मृतदेह घेऊन येत असणाऱ्या नातेवाईकांचा पुन्हा फोन येतो. अॅम्बुलन्स आरसीएफ कॉलनीतील हॉस्पीटलमध्ये घेऊन जात आहोत' कोणालात काहीही समजत नाही, अखेर काही वेळाने समजते जी बॅग मृत व्यक्तीची म्हणून पाठवलेली होती, त्या बॅगमध्ये हलचाल दिसून येत आहे. बॅममधील व्यक्ती जिवंत होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारानंतर प्रकृती सुधारु लागते. आणि चार ते पाच तासानंतर त्यांचे खरोखर निधन होते. जीवन मृत्युचा हा  पाटशिवीचा खेळ शनिवार (ता. 30) अलिबागमध्ये अनुभवायास मिळाला.

कोरोना वॉर्डातून मिळाला डिशचार्ज, घरी आलेत आणि अवघ्या चार तासात....

अलिबाग तालुक्यातील थळ येथील बबन म्हात्रे (लाटकर) यांचे मुंबईतील रुग्णालयात कॅन्सरवर उपचार सुरु होते. शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाल्याचे कळविण्यात आले होते. डॉक्टरांनीही त्यांचे डेथ सर्टिफेकेट तयार करुन मृतदेह घेऊन जाण्यास परवानगी दिली होती. वडखळ येथून येत असताना खड्ड्यात गाडीने गचका घेतल्यानंतर मृतदेह ठेवलेल्या बॅगमध्ये हालचाल होत असल्याचे दिसून आले.  बरोबर आलेल्या नातेवाईकांनी पाहिले असता श्वास सुरु झाला होता. अॅम्बुलन्स परत घेऊन जाणे शक्य नसल्याने ते जवळचा हॉस्पिटल गाठण्याचे ठरवुन आलिबागला पोहचले, आरसीएफ कॉलनीतील हॉस्पीटलमध्ये तत्काळ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु झाल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारु लागली. परंतु शनिवारी सकाळी 11.00 वाजता पुन्हा प्रकृती खालावल्याने निधन झाले. बबन म्हात्रे (वय 65) यांच्यावर थळ येथील स्मशानभूमीमध्ये सायंकाळी उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी आणि थळ गावातील नागरिकांनी सांगितली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The body, sent with a death certificate, came alive halfway through