esakal | मुंबई: सेक्सवर्धक औषधांच्या नावाखाली परदेशी नागरिकांची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Medicine

मुंबई: सेक्सवर्धक औषधांच्या नावाखाली परदेशी नागरिकांची फसवणूक

sakal_logo
By
अनिश पाटील, प्रतिनिधी

मुंबई: सेक्सवर्धक औषधांची विक्री करत असल्याचे भासवून परदेशी नागरिकांची (forign nationals) फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या युनिट - 9 च्या पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी 10जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. जोगेश्वरी पश्चिम येतील बेहराम बाग लिंक रोड येथील रेंज हाईट्स इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये अलटीट्युड नावाचे बनावट कॉल सेंटर सुरू असून या ठिकाणी परदेशी नागरिकांना व्हायग्रा, सियासील, लिव्हिटराया या सेक्सवर्धक औषधांची विक्री करीत आहे, असे भासवून त्यांच्याकडे पैशांची मागणी करून त्यांची फसवणूक करण्यात येत आहे, अशी माहिती युनिट 9 चे पोलिस उपनिरिक्षक. विजयेंद्र आंबवडे यांना मिळाली. (bogus call center on the name of medicine forign nationals cheated by gang in mumbai)

त्यानुसार या प्रकरणाची वरिष्ठांना माहिती देण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशावरून युनिट - 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय खतांळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. रवींद्र साळुंखे, पोनि. सुधीर जाधव व इतरांनी घटनास्थळी छापा टाकला. येथील 9 संगणकावर यातील आरोपी परदेशी नागरिकांशी सेक्सवर्धक औषधांबाबत बोलणी करून त्यांना औषधे न पुरवता त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचे उघड झाले.

हेही वाचा: सोशल मीडियावर 'चेल्लम सरांची' क्रेझ, उदय महेश आहेत तरी कोण?

यावरून पोलिसांनी बेकायदेशीरपणे कॉल सेंटर चालवणाऱ्यांवर ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या प्रकरणी 10 जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले