बनावट कागदपत्रे बनवणाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

मुंबई - बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळवून अल्पवयीन मुलांना विदेशात नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणी अस्लम रफीक पांचाळ (वय 52) याला अटक केली. या प्रकरणी अटक झालेला हा सहावा आरोपी आहे.

पांचाळ खारघर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला पकडण्यात आले. बनावट कागदपत्रांद्वारे अनेक अल्पवयीन मुलांची पारपत्रे बनवल्याची कबुली त्याने दिली आहे. यापूर्वी आरिफ शफी फारुख (38), राजेश बळीराम पवार (47) व फातिमा फरीद अहमद (46) यांना विमानतळावर अटक करून चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली होती.

Web Title: bogus document maker arrested

टॅग्स