खंडणीसाठी धमकावणारे तोतया पोलिस गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

ठाणे : खासगी क्‍लिनिकमध्ये गर्भपाताच्या गोळ्या स्वत:च ठेवून पोलिस असल्याचे भासवत खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. या टोळीमध्ये दोघी महिला असून त्यांनी प्रकरण दडपण्यासाठी तब्बल दोन लाखांची खंडणी डॉक्‍टरकडे मागितली होती.

23 आणि 24 ऑगस्ट रोजी हे खंडणीनाट्य शिळ डायघर व नवी मुंबई क्षेत्रात घडले. याप्रकरणी, शिळ-डायघर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप कांबळे, अशोक शिरवडे, अनिता थापा, शैलेश यादव, सविता जाधव अशी अटक आरोपींची नावे आहेत. सिमला पार्क येथे राहणारे होमिओपॅथी डॉक्‍टर नदीम बेग यांचे शिळफाटा येथे क्‍लिनिक आहे.

गुरुवारी रात्री त्यांच्या क्‍लिनिकमध्ये महिलेसोबत आलेल्या त्रिकुटाने क्‍लिनिकमधील रुग्णांना हाकलून देत स्वतः जवळच्या गर्भपाताच्या गोळ्या क्‍लिनिकमध्ये ठेवून डॉ. बेग यांना ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. आम्ही पोलिस अधिकारी आहोत, तुमच्यावर केस करावी लागेल. जर केस करायची नसल्यास दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे धमकावले. मात्र, डॉ. बेग यांनी ही रक्‍कम देण्यास नकार देत तातडीने मेडिकल असोसिएशनशी संपर्क साधला. 

घटनाक्रम 

दरम्यान, शुक्रवारी जाधव या महिलेने डॉ. बेग यांना संपर्क साधून दुपारी कोपरखैरणे पोलिस ठाण्यानजीकच्या चौकीजवळ रक्कम घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार डॉ. बेग आणि मेडिकल असोसिएशनच्या सात डॉक्‍टरांचे पथक कोपरखैरणे येथील पोलिस चौकीजवळ पोहचले.

तेथे गेल्यावर या भामट्यांनी डॉ. बेग व त्यांच्या सोबत असलेल्या डॉ. शेख यांचे मोबाईल जप्त करून चौकीशेजारील हॉटेलमध्ये नेले. मात्र, खंडणी उकळण्याआधी डॉ. शेख यांनी शौचालयात जाण्याच्या बहाण्याने सोबतच्या इतर डॉक्‍टरांना सतर्क करून या टोळीला पकडून कोपरखैरणे पोलिसांच्या हवाली केले. 

Web Title: Bogus Police Arrested