

Maharashtra News 25 Year Old Man Found Dead in Boisar Parents Raise Suspicion Forensic Team Examines the Scene
esakal
-संतोष घरत
बोईसर : दांडीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणातील पाण्याच्या टाकीला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह मंगळवारी (ता. २७) पहाटे आढळून आला. प्रतीक भगवान डुकले (वय २५, रा. तलवाडा) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूबाबत आई-वडिलांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.