'त्या' बोलिव्हियन तरुणीच्या पोटात होतं सव्वा दोन कोटीचं घबाड...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

मुंबई - अंमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या करोला लिसेट बोलीवर बेजारानो (30) या बोलिव्हियन महिलेच्या पोटातून कोकेन भरलेल्या 72 कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. त्यासाठी जे. जे. रुग्णालयातील डॉक्‍टरांना पाच दिवस प्रयत्न करावे लागले. तिच्याकडून जप्त केलेल्या कोकेनची किंमत सव्वादोन कोटी रुपये असल्याची माहिती हवाई गुप्तवार्ता विभागाच्या (एआययू) अधिकाऱ्यांनी दिली.

मोठी बातमी - धक्कादायक ! मुलींना सांगितलं 'मासिक पाळी नाही' हे सिद्ध करण्यासाठी अंतर्वस्त्र काढा...

करोला लिसेट बोलीवर बेजारानो ही बोलिव्हियन तरुणी इथिओपियन एअरलाईन्सच्या विमानाने आदिस अबाबा येथून मुंबईत आली होती. एआययूला मिळालेल्या माहितीवरून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शनिवारी सकाळी तिला ताब्यात घेण्यात आले. तिच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता या महिलेवर वैद्यकीय चाचणी करण्यासाठी शनिवारी न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार जे.जे. रुग्णालयात तिचा एक्‍सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्या पोटात संशयीत कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर डॉक्‍टरांनी तिच्या पोटातून या 72 कॅप्सूल काढल्या. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.

मोठी बातमी - चोरीऐवजी घरातील उंची दारू प्यायला आणि चोराला सोफ्यावर लागली झोप, मग...

जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन 715 ग्रॅम असून त्याची किंमत दोन कोटी 14 लाख रुपये आहे. या सर्व प्रकरणामागे सांताक्रुज येथे राहणाऱया बोलीवियातील नागरीकाचा सहभाग आहे.त्यानेच तिला पोटात कॅप्सूल लपवून प्रवास कसा करायचा, हे शिकवले होते. तस्करी करून आणलेले ड्रग्सही तिला त्याच व्यक्तीचा द्यायचे होते. तिचा तिकीटखर्चही आरोपीने केला होता. याप्रकरणामागे मोठी आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचे तार अमेरिकेपर्यत पोहोचले आहेत. यापूर्वी या महिलेने अशा पद्धतीने भारतात ड्रग्स आणले का, याबाबत अधिक तपास सुरू आहे. 

bolivian lady arrested on bombay airport for smuggling cock

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bolivian lady arrested on bombay airport for smuggling coke