अभिनेता अरमान कोहलीवर प्रेयसीला मारहाणीचा आरोप

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

फॅशन स्टायलिस्ट बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीची प्रेयसी निरु रंधवा हिने आरोप केला आहे की, कोहलीने तिचे केस ओढले आणि तिला मारहाण केली. यासोबतच तिच्या फॅमिलीसह तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. नीरू रंधवा ही एक फॅशन स्टायलिस्ट आहेत.

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अरमान कोहली याच्या विरोधात प्रेयसीला मारहाण केल्याचा गुन्हा मुंबईच्या सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फॅशन स्टायलिस्ट बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीची प्रेयसी निरु रंधवा हिने आरोप केला आहे की, कोहलीने तिचे केस ओढले आणि तिला मारहाण केली. यासोबतच तिच्या फॅमिलीसह तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. नीरू रंधवा ही एक फॅशन स्टायलिस्ट आहेत.

सूत्रांच्या माहिती नुसार, त्या दोघांमध्ये आर्थिक कारणामुळे वाद झाले. या वादामुळे कोहली चिडला आणि तिला पायऱ्यावरून ढकलून दिले. तिने आरोप केला आहे, की कोहलीने तिचे केस धरून तिचे डोके जमिनीवर आपटले. रंधावावर हल्ला केल्यानंतर तिच्या डोक्याला दुखापत झाली.  त्यानंतर रंधावाला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अरमान कोहलीवर कलम ३२३, ३२६, ५०४  व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. ते दोघे २०१५ पासून लिव्ह इन रीलेशनशिप मध्ये आले होते. त्या दोघांच्या ओळखीचा एका मित्रामुळे ते दोघे एकत्र आले. अरमान कोहलीने आपल्या वडिलांचा दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचा विरोधी (१९९२) हा चित्रपट प्रदर्शित केला होता. त्याने आतापर्येत दुश्मन (२००२) आणि कारगिल (२००३) चित्रपटांची निर्मिती केली पण हे दोन्ही चित्रपट तितके गाजले नाहीत. त्यानंतर तो फक्त सलमान खानच्या टीव्ही शो बिग बॉसमध्ये भूमिकेत दिसला. टीव्ही शो दरम्यान, त्यांने तनिषा मुखर्जींचा सोबत डेटिंग सुरु केले. पण स्वभाव आणि व्यक्तिमत्वांमधील फरकांमुळे हे दोघे वेगळे झाले.

Web Title: Bollywood actor Armaan Kohli booked for assaulting live-in partner Neeru Randhawa