esakal | आपला एकच हिरो, मुंबई पोलिस! 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

कोरोना संकटाविरोधात लढणाऱ्या खाकी वर्दीला बॉलीवूड कलाकारांनी सलाम केला आहे. 
ट्विटरवर संदेश देत आयुष्मान खुराना, अक्षय कुमार, अजय देवगन, टायगर श्राॅफ आदींनी खरे हिरो पोलिसच असल्याचे म्हटले आहे.

आपला एकच हिरो, मुंबई पोलिस! 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अत्यावश्‍यक सेवतील कर्मचारी मात्र कार्यरत आहेत. कायदा-सुव्यस्था राखण्यासाठी नेहमीच दिवस-रात्र झटणारे मुंबई पोलिस आजही देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी अविरत काम करताहेत. त्यांच्या विलक्षण योगदानाला बॉलीवूडकरांनीही सलाम केला आहे. समाजमाध्यमावर अनेक पोस्ट शेअर करून त्यांचे मनापासून कौतुक केले आहे. अभिनेता आयुष्मान खुराना, अक्षय कुमार, अजय देवगण, टायगर श्रॉफ आदी कलाकार त्यात आघाडीवर आहेत. 

हे वाचलं का? : कामावर न येणाऱ्या कामगारांना बेस्टचा दणका

आयुष्मान खुरानाने मुंबई पोलिसांचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. पोलिसांना टॅग करत मराठीमध्ये त्याने ट्विट केले आहे. तो म्हणतो, "तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत. मी तुमचे मनापासून आभार मानतो. जय हिंद!' 
अक्षय कुमारनेही पोलिसांचे कौतुक करणारा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यामध्ये तो म्हणतो, "देशवासीय आणि आपले कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी मुंबई पोलिस दिवसरात्र मेहनत घेत आहेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांचे आभार मानले पाहिजेत.' 

हेही वाचा : मुद्रा, तुझा वाढदिवस कोरोनाचे सावट दूर झाल्यावरच

"प्रिय मुंबई पोलिस तुम्ही संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट पोलिस फोर्स म्हणून ओळखले जाता. कोरोना विषाणूपासून जनतेला वाचविण्यासाठी तुमचे योगदान फारच कौतुकास्पद आहे. तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा खाकी वर्दीतला "सिंघम' तुमच्या मदतीसाठी हजर असेल,' असे ट्विट अजय देवगनने केले आहे. 

महत्त्वाचे : काळाबाजार करत असाल तर सावधान...!

टायगर श्रॉफनेही मुंबई पोलिसांचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. "मुंबई पोलिस आम्ही सर्व फारच भाग्यवान आहोत की तुम्ही जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहात. तुम्ही आमचे खरे हिरो आहात. तुमचे जितके आभारी मानू तितके कमी आहेत,' असे टायगरने म्हटले आहे. रवीना टंडननेही ट्विटद्वारे पोलिसांचे आभार मानले आहेत. "आपल्या कुटुंबियांना घरी सोडून देशवासीयांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस अथक प्रयत्न करत आहेत. अशा आमच्या मुंबई पोलिसांचे आभार,' असे तिने म्हटले आहे. 

निःस्वार्थी अन्‌ अथक प्रयत्नाबद्दल आभार 
निर्माते-दिग्दर्शक करण जौहरनेही पोलिसांचे आभार मानले आहेत. तो म्हणतो, "मुंबई पोलिस निःस्वार्थीपणे आणि अथक प्रयत्न करत देशातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहेत. आपल्या कुटुंबियांपासून दूर असूनही ते आमच्या रक्षणासाठी कार्य करत आहेत. त्यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत.'