esakal | 'कोरोना' विषाणूंवर तयार होणार चित्रपट; नाव काय आहे माहितीये ? वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

'कोरोना' विषाणूंवर तयार होणार चित्रपट; नाव काय आहे माहितीये ? वाचा...

'कोरोना' विषाणूंवर तयार होणार चित्रपट; नाव काय आहे माहितीये ? वाचा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई -  जगभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. हजारो लोकांची या विषाणूने मृत्युमुखी पडले आहेत. या कोरोना विषाणूचा फटका मनोरंजन क्षेत्रालाही पडला आहे. यामध्ये नाट्यगृह, चित्रपटगृह, मालिका-चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या सगळ्यामध्ये चित्रपट निर्मात्यांमध्ये कोरोना विषाणूवर चित्रपट निर्मिती करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.

मोठी बातमी - 'या' पदार्थांचे सेवन करा आणि तुमची वाढावा इम्युनिटी...

अशातच कोरोना विषाणूशी मिळतं जुळतं  नाव असणाऱ्या एका चित्रपटाच्या शीर्षकाचे रजिस्टर निर्मात्यांनी केले आहे. "करोना प्यार है' असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. विशेष म्हणजे "तनु वेड्‌स मनु', "बाजीराव मस्तानी', "बदलापूर' सारख्या हिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या "इरॉस इंटरनॅशनल फिल्म्स'ने या चित्रपटाच्या शीर्षकाची नोंदणी केली आहे.

करोना विषाणूवर आधारित एक प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू असून चित्रपटातील कोणते कलाकार काम करणार हे सांगण्यात आलेले नाही. कोरोना विषाणू नाहिसा झाल्यानंतर या चित्रपटावर काम सुरू करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक 2000 साली प्रदर्शित झालेल्या "कहो ना प्यार है' या चित्रपटाच्या नावाशी मिळतं जुळतं आहे.

मोठी बातमी - कोरोनाबाबत अफवा पसरवताय? मग भोगा 'ही' शिक्षा!

कोरोना व्हायरसच्या नावावर रजिस्टर झालेलं हे पहिलचं नाव आहे. याशिवाय इम्पा (इंडियन मोशन पिक्‍चर्स प्रोड्युसर्स असोसिएन) यांच्याकडे "डेडली करोना' हे शीर्षक असणारा चित्रपट रजिस्टर करण्यात आला आहे.  

bollywood to make movie on the harmful corona virus and covid19 check what is name

loading image
go to top