'या' पदार्थांचे सेवन करा आणि तुमची वाढावा इम्युनिटी...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 March 2020

मुंबई : सध्या जगभरात अनेक निरनिराळे आजार रोग डोकं वर काढतायत.  यामुळे अनेकांचे विनाकारण जीव जातायत. याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांमधील कमी होत चाललेली रोगप्रतिकारक क्षमता. मात्र आता घाबरून जाऊ नका आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्यांचं नियमित सेवन केल्यामुळे तुम्ही तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकता.

मुंबई : सध्या जगभरात अनेक निरनिराळे आजार रोग डोकं वर काढतायत.  यामुळे अनेकांचे विनाकारण जीव जातायत. याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांमधील कमी होत चाललेली रोगप्रतिकारक क्षमता. मात्र आता घाबरून जाऊ नका आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्यांचं नियमित सेवन केल्यामुळे तुम्ही तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकता.

अनेकदा लोकांची एकच तक्रार असते ती म्हणजे त्यांना चटकन कोणताही आजार होतो.  तसंच काही लोकांना सतत सर्दी, खोकला, ताप किंवा पोटाच्या समस्या असतात. या सगळ्यापासून वाचण्यासाठी लोकं अनेक औषधं देखील घेतात. मात्र काहीही फायदा होत नाही. मात्र आपल्या दैनंदिन जीवनातल्या काही पदार्थांचं सेवन केल्यामुळे तुम्ही तुमची ईम्युनिटी वाढवू शकणार आहात.

हेही वाचा : मनसेचा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द,कारण आहे.....

कोणते आहेत हे पदार्थ:

(१) आंबट फळं: 

आंबट फळं म्हणजे लिंबू, मोसंबी, संत्र, द्राक्षं ही फळं खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता प्रचंड प्रमाणात वाढते. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असतं. तसंच सर्दी कफपासून संरक्षण करण्यासाठी ही फळं खाणं महत्वाचं आहे. 

(२) ब्रोकोली: 

ब्रोकोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए, सी आणि ई असतं. त्याशिवाय ब्रोकोलीमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. म्हणून रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी ब्रोकोली लाभदायी आहे. 

(३) लाल शिमला मिरची:

लाल शिमला मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणावर बीटा केरोटीन असतं. ज्यामुळे तुमचे डोळे चांगले राहतात. लाल शिमला मिरचीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.  

हेही वाचा: गरज नसताना मास्क लावून फिरणे म्हणजे आजारांना आमंत्रण,वाचा रिपोर्ट 

(४) आलं:

आलं हे अत्यंत महत्वाच्या अँटी व्हायरल तत्वांचं भांडार मानलं जातं. आलं बडीशेप किंवा मधात मिसळून नियमित खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. 

(५) लसूण:

लसणामध्येही मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट असतात जे तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवनसाठी मदत करतात. दररोज एक लसूण मधात मिसळून खाल्ल्यामुळे तुमची इम्युनिटी पावर वाढते. 

(६) तुळस:

तुळशीचे पानं म्हणजे आयुर्वेदातलं महत्वाचं औषध. तुळशीच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर एनर्जी वाढवणारे गुण असतात. तुळशीच्या पानांच्या रसाचं नियमित सेवन केल्यामुळे तुम्ही  रोगांपासून दूर राहू शकता. तुळशीचे पानं नियमित खाल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

हेही वाचा: आता कोरोनाचे वाजणार 'बारा',रामदास आठवलेंची 'ही' नवीन कविता माहितीये का?

(७) बदाम:

बदाममध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ई  असतं ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. दररोज ८-१० बदाम खाल्ल्यामुळे तुमची इम्युनिटी पावर नक्कीच वाढण्यासाठी मदत होते. 

(८) पालक: 

पालेभाजी खाल्ल्यामुळे इम्युनिटी वाढते हे आपण ऐकलं आहे. मात्र त्यातही पालक खाणं फायद्याचं आहे. कारण पालकमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट असतात आणि व्हिटॅमिन सी असतं ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. 

(९) हळद:

हळद ही अँटिबायोटिकचं काम करते हे तुम्हाला माहितीच आहे. मात्र हळदीत असलेल्या अँटीइंफ्लेमेटरी गुणांमुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. 

(१०) नारळाचं तेल:

नारळाच्या तेलात लॉरिक ऍसिड असतं जे रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यात मदत करतं. त्यामुळे नारळाच्या तेलाचं नियमित सेवन करणं महत्वाचं आहे. 

हेही वाचा: तुमचं आमचं जीवनमान उंचावणाऱ्या नद्यांसाठीचा आजचा दिवस,वाचा स्पेशल रिपोर्ट 

या काही पदार्थांच्या सेवनामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता. 

eat this food items regularly and increase your immunity power read full story

      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eat this food items regularly and increase your immunity power read full story