कोरोनाबाबत अफवा पसरवताय? मग भोगा 'ही' शिक्षा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

समाज माध्यमांवरून कोरोना संसर्गाबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, अशी सूचना पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांना केली आहे. अशा प्रकारे अफवा पसरवणाऱ्यांवर माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यानुसार फौजदारी कारवाई होऊ शकते.

मुंबई : समाज माध्यमांवरून कोरोना संसर्गाबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, अशी सूचना पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांना केली आहे. अशा प्रकारे अफवा पसरवणाऱ्यांवर माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यानुसार फौजदारी कारवाई होऊ शकते.

ही बातमी वाचली का? राजकिय निवडणुका कोरोनाच्या सावटाखाली?

केंद्र सरकारने सर्व कार्यालयांना सुटी जाहीर केली आहे, असा संदेश शुक्रवारी समाज माध्यमांवर फिरत होता. त्यावर राज्य सरकारला खुलासा करावा लागला होता. त्याचबरोबर मुंबईत आढळलेल्या कोरोना रुग्णाबाबतही अनेक संदेश व्हायरल झाले होते. त्याची दखल परदेशी यांनी घेऊन शनिवारी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांना पत्र पाठवले आहे. समाज माध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती परदेशी यांनी परमवीर सिंह यांना केली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा, (२००५) कलम क्र. ५४ अंतर्गत त्यांनी ही सूचना केली आहे. अशाप्रकारे समाज माध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई होणार आहे.

ही बातमी वाचली का? सरोगसी म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या...

मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांना सात वर्षे तुरुंगवास 
मास्क व सॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. दोन्ही बाबी ३० जूनपर्यंत जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये समाविष्ट करण्याचे केंद्राने काल जाहीर केले होते. त्यांचा काळाबाजार करणाऱ्यांवर सात वर्षांच्या तुरुंगवासाचा बडगा 
उगारण्यात येणार आहे. 

ही बातमी वाचली का? सिडकोत कोट्यवधींचा भूखंड घोटाळा

सॅनिटायझरची अनावश्‍यक खरेदी केल्यास एफडीएकडून कारवाई
राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ग्राहकांना सॅनिटायझरची अनावश्‍यक खरेदी करू नका, असे आवाहन केले आहे. एखादी व्यक्ती सॅनिटायझरची गरजेहून अधिक खरेदी करत असल्यास कारवाई करण्यात येईल, असे एफडीए आयुक्त अरुण उन्हाळे यांनी स्पष्ट केले आहे.
एखाद्या व्यक्तीने गरजेपेक्षा जास्त सॅनिटायझर खरेदी केल्यास बाजारात तुटवडा निर्माण होईल, असे एफडीएने म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminal action now on corona rumors spread!