

Mumbai Bomb Threat
ESakal
मुंबई : काही दिवसांपूर्वीच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता. ज्यामध्ये महापौर कार्यालय, न्यायालयाची इमारत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, वरळी रेसकोर्स आणि अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला उडवणार असल्याचे म्हटले होते. या धमकीला आठवडा देखील उलटला नसताना आता पुन्हा मुंबईला बॉम्बने उडवणार असल्याचा मेल देण्यात आला आहे.