दिवाळीत दोन जैन मंदिरे उघडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

दिवाळीत दोन जैन मंदिरे उघडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

मुंबई: धनत्रयोदशी ते भाऊबीज या पाच दिवसांसाठी शहरातील दोन जैन मंदिरे सशर्त खुली करण्यासाठी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र सरसकट 102 मंदिरे खुली करण्यासाठी नकार दिला. दरम्यान, दिवाळीनंतर प्रार्थनास्थळे खुली करण्यावर सरकार विचार करीत आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

दिवाळी जैन समाजासाठी महत्त्वाचा सण असून या दिवसात मंदिरे खुली करावी, अशी मागणी करणारी याचिका दोन ट्रस्टच्या वतीने स्वतंत्रपणे करण्यात आली होती. याचिकादारांच्या मंदिरासह सरसकट102 मंदिरे खुली करण्याची मागणी एड प्रफुल्ल शहा यांनी खंडपीठापुढे मंगळवारी केली. मात्र या मागणीला राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी विरोध केला.

दिवाळी हा केवळ जैन समुदायासाठी मोठा सण नसून समस्त हिंदू समाजासाठी आहे. त्यामुळे जैन समाजात दिवाळीचे पाच दिवस महत्त्वाचे आहेत हा दावा फोल आहे, असे कुंभकोणी म्हणाले.  दिवाळीनंतर सर्वच प्रार्थनास्थळे खुली करण्यावर विचार सुरु आहे, सर्व धर्मियांना त्यांच्या प्रार्थना स्थळांना भेट देण्याची उत्सुकता आहे. कोरोना पाश्वभूमीवर राज्य सरकारला जाणीव आणि जबाबदारी आहे. त्यामुळे सरकार या परिस्थितीवर संयमाने विचार करत आहे, असे महाधिवक्तांनी स्पष्ट केले. तसेच सर्व मंदिरे खुली करु नये कारण याचिकादारांनी जनहित याचिका केली नसून स्वतंत्र याचिका केली आहे, असा युक्तिवाद केला. न्या शाहरुख काथावाला आणि न्या.अभय अहुजा यांच्या खंडपीठाने हा युक्तिवाद मान्य केला आणि दोन मंदिरांना सशर्त परवानगी दिली.

राज्य सरकारने बार, थिएटर, हौटेल खुले केले पण मंदिरे नाही, असा युक्तिवाद याचिकादारांकडून करण्यात आला. मात्र याला महाधिवक्तांनी आश्चर्य व्यक्त केले. बार आणि मंदिराची तुलना कशी केली जाते. व्यावसायिक आणि आर्थिक कारणावरून बार सुरू करण्यात आली. त्यामुळे अशी तुलना होऊ शकत नाही, असे महाधिवक्तांनी सांगितले.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

The Bombay High Court allows opening of two Jain temples on Diwali

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com