Mumbai News: पुनर्विकास याचिकेत नव्या विकसकाला नकार, घाटकोपरमधील भाडेकरूंना ठोठावला पाच लाखांचा दंड

Mumbai High Court : घाटकोपरमधील भाडेकरूंनी पुनर्विकासासंदर्भातील याचिकेत नवीन विकसकाबाबत अर्ज दाखल केला. मात्र तो अर्ज फेटाळून लावत उच्च न्यायालयाने भाडेकरूंना पाच लाखांचा दंड ठोठावला.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

मुंबई : घाटकोपर (पश्चिम) येथील जमीनदोस्त केलेल्या इमारतीमधील ५२ भाडेकरूंनी, पुनर्विकासासंदर्भातील याचिकेत नवीन विकसकाला पक्षकार म्हणून समाविष्ट करून घेण्याकरिता केलेला अर्ज उच्च न्यायालयाने नुकताच फेटाळून लावला. हा अर्ज म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आणि पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com