Mumbai High court
Esakal
मुंबई : कोपर्डी (अहिल्यानगर) बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या पुष्टीकरणाचा निर्णय घेण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने घटनास्थळाची भौगोलिक परिस्थिती आणि साक्षीदारांच्या जबाबांतील घटनाक्रम यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. साक्षीदारांनी आरोपींच्या हालचाली जेथून पाहिल्याचा दावा केला, तेथून प्रत्यक्षात घटनास्थळ, रस्ता आणि आरोपींची ये-जा दिसणे शक्य होते का, तसेच पीडितेची सायकल आणि कपडे आढळलेल्या ठिकाणांतील अंतर व परिसराची रचना काय आहे, हे न्यायालय प्रत्यक्ष पाहणार आहे.