Mumbai High Court
esakal
मुंबई : शीव पूर्वेतील बंद पडलेल्या सायकल मार्गिकेच्या जागेवरील राडारोडा आणि कचरा साफ करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच महापालिकेला दिले. ही जागा नियमितपणे स्वच्छ ठेवण्यासाठी एक यंत्रणा नेमण्याचेही आदेश न्यायालयाने दिले. तथापि, हा मुद्दा उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकेवरील हेतूबाबतही न्यायालयाने याचिका निकाली काढताना प्रश्नचिन्ह उपस्थित केले.