

Nitin Gadkari
ESakal
मुंबई : इथेनॉल मिश्रित इंधनाच्या (ई-२०) वादावरून केंद्रीय मंत्री नितीन बदनामी करणारा समाजमाध्यमांवरील मजकूर अत्यंत घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील असल्याचे निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाने तो तत्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. मेटा, एक्स कॉर्प आणि गुगल एलएलसी या कंपन्यांना न्यायालयाने कडक निर्देश देताना अशा मजकुराला ऑनलाइन माध्यमांत अजिबात स्थान देता कामा नये, असे कडक शब्दांत सुनावत गडकरी यांना दिलासा दिला.