

Bombay High Court Questions Mumbai Police Over SDPI Externment
Esakal
मुंबई पोलिसांनी दिलेल्या तडीपारच्या आदेशाला हायकोर्टानं अवैध आणि कठोर असल्याचं म्हणत रद्द ठरवलं. मंगळवारी या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली त्यावेळी हायकोर्टानं पोलिसांना खडे बोल सुनावले. मुंबई पोलिसांनी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या दोन पदाधिकाऱ्यांना तडीपारचे आदेश दिले होते. हायकोर्टानं यावर, ते एका विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून कारवाई केली का? असा सवाल केला.