बेस्टचा तिढा कायम; उद्या परत होणार सुनावणी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 14 जानेवारी 2019

बेस्टच्या संपाचा तिढा कायम असून तो सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. संपाबाबत कृती समितीच्या बैठकित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून, उच्च न्यायलयात उद्या (मंगळवार) पुन्हा सुनावणी होणार आहे.

मुंबई : बेस्टच्या संपाचा तिढा कायम असून तो सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. संपाबाबत कृती समितीच्या बैठकित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून, उच्च न्यायलयात उद्या (मंगळवार) पुन्हा सुनावणी होणार आहे.

संप आजही सातव्या दिवशीही सुरुच राहणार असून संघटना कृती समितीच्या बैठकीत सांयकाळी निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच उद्या सकाळी उच्च स्तरीय बैठक होणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने तुम्हाला चर्चा नको, संप पण मागे घ्यायचा नाही. महापालिका-सरकार चर्चा करायला तयार आहे, पण तुम्ही नाही, या शब्दांत आज (सोमवार) बेस्ट कर्मचाऱ्यांना फटकारले आहे. 

बेस्टने संप मागे घ्यावा आणि वाटाघाटी कराव्यात अशी भूमिका मांडली, मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात मांडली. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. संपाबाबत दाखल याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सर्वसामान्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचं सांगत बेस्ट कर्मचाऱ्यांना सुनावले आहे. संपावर कायम राहून तडजोडीची चर्चा करणे योग्य नाही. बेस्ट संपाबाबत होणाऱ्या सुनावणीला महाधिवक्त्यांनी हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Bombay High Court rebukes BEST workers