

कोणत्याही ठिकाणी नमाज पठण करणे हा धार्मिक अधिकार मानला जाऊ शकत नाही विशेषत :ज्या ठिकाणी धोके असतात, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ नमाज पठण करण्यास परवानगी देण्यास उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला. सुरक्षेशी अजिबात तडजोड करता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले. टॅक्सी-रिक्षा ओला-उबर मेन्स युनियनच्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर हा निर्णय देण्यात आला.