

High Court Order On Dia Mirza’s Diwali Video
ESakal
मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये मुंबईकरांना या दिवाळीत सार्वजनिक रस्त्यांवर फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. या व्हिडिओवर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी पोस्ट शेअर करत 'दिवाळी कशी साजरी करावी याचे धडे घेण्याची आपल्याला गरज नाही' असे म्हटले होते. यानंतर बीएमसी प्रशासनाने दिया मिर्झाचा व्हिडिओ हटवण्यात आला, ज्यामुळे नवनवीन चर्चांना उधाण आले.