जेलमध्ये राहणार की मिळणार बेल? अर्णब यांच्याबाबतचा फैसला आज होण्याची शक्यता

सुमित बागुल
Saturday, 7 November 2020

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मुंबई : अर्णब गोस्वामी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान अर्णब यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात अर्णब यांच्या जामीनावरील सुनावणीस सुरवात झाली आहे.  

महत्त्वाची बातमी : पहिल्यांदाच शिवाजी पार्क मैदानातून सापडतायत साप, नागरिकांमध्ये भीतीची भावना

आज खरतर शनिवार, शनिवारी कोर्ट बंद असतं. मात्र स्पेशल केस म्हणून आज न्यायालय सुरु आहे आणि न्यायालयात याबाबत सुनावणीस सुरवात झाली आहे. अर्णब यांच्या वकिलांकडून अर्णब यांची झालेली अटक कशी बेकायदा आहे हे पटवून देण्याचा प्रयन्त केला जातोय. अर्णब गोस्वामी यांच्यासह अन्य दोघांनाही अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून देखील हाच युक्तिवाद उच्च न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे आज मुंबई उच्च न्यायालयात काय निकाल लागतो यावरून अर्णब यांना बेल मिळते का ते जेलमध्येच राहतात याचा फैसला होणार आहे. 

महत्त्वाची बातमी :  रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीने विशेष न्यायालयात पुन्हा जामीनासाठी अर्ज केला दाखल

तर दुसरीकडे अलिबाग सत्र न्यायालयात अर्णब यांच्या पोलिस कस्टडीची मागणीही केली जातेय. अर्णब यांना पोलिस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडी दिली गेलेली.  त्या निकालाला रायगड पोलिसांनी आव्हान दिलं आहे. अलिबाग सत्र न्यायालयातील पुढील सुनावणी आता ९ नोव्हेंबररोजी होणार आहे.  

bombay high court starts hearing of arnab gowamis bail plea in anvay naik case


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bombay high court starts hearing of arnab gowamis bail plea in anvay naik case