रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीने विशेष न्यायालयात पुन्हा जामीनासाठी अर्ज केला दाखल

रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीने विशेष न्यायालयात पुन्हा जामीनासाठी अर्ज केला दाखल
Updated on

मुंबई ता. 7 : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात अमलीपदार्थांच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीने आता पुन्हा विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या अमलीपदार्थ संबंधित प्रकरणाचा दाखला या अर्जामध्ये दिला असून त्यावर जामीनाची मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार तपास अधिकाऱ्यांसमोर केलेल्या जबाबावरून एखाद्या आरोपीला दोषी ठरवता येणार नाही. शोविककडे अमलीपदार्थ सापडले नाही आणि त्याने कधी ते स्वतः साठी बाळगले नाही, त्यामुळे त्याला जामीन मंजूर करावा, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

मागील एक महिन्यापासून तो कारागृहात आहे. विशेष एनडीपीएस न्यायालय आणि उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. त्याचा ड्रग विक्रेत्यांशी संपर्क होता आणि सुशांतला देण्यासाठी तो ड्रग घ्यायचा या तपास अधिकाऱ्यांचा जबाब न्यायालयाने ग्राह्य मानला होता. 

एनसीबीकडे केवळ सहआरोपींनी दिलेला जबाब हाच शोविकविरोधात पुरावा आहे, असा दावा त्याचे वकिल एड सतीश मानेशिंदे यांनी अर्जामध्ये केला आहे. अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

आरोपी क्षितिज प्रसादनेही न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. बॉलिवूडमधील बड्या हस्तींची नावे घेण्यासाठी तपास अधिकारी दबाव टाकत आहेत, असा आरोप प्रसादने यापूर्वी न्यायालयात केला होता. याप्रकरणात एनसीबीने सातहून अधिकजणांना अटक केली आहे. रियासह तीनजणांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

( संपादन - सुमित बागुल )

Rheas brother Showik Chakraborty has again applied for bail in a special court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com