बोर्डी - झाई गावात पाईपलाईन द्वारे गॅसजोडण्यांबाबत संभ्रमावस्था

अच्युत पाटील
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

बोर्डी - बोर्डी आणि झाई गावात पाईपलाईन द्वारे गॅसजोडण्या देण्याची योजना बारगळल्याने जोडण्या घेण्यासाठी अनामत रक्कम जमा केलेले ग्राहक संभ्रमावस्थेत पडले आहेत.

15 ऑगस्ट 2015 मध्ये बोर्डी, झाई गावाला पाईपलाईन द्वारे गॅसजोडण्या देण्यासाठी गुजरात गॅस कंपनीला अधिकृत काम सोपविण्यात आले आहे.

सदर काम सुरू करण्यापुर्वी ग्रामपंचातीच्या ग्रामसभेत बहुमताने ठराव संमत करुन 2016 मध्ये कामाला सुरुवात करुन संपुर्ण गावात भुमिगत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. पाईपलाईन टिकनाना आनेक ठिकाणी रस्त्याचे खोदकाम केल्याने गैरसोय सोसावी लागली होती. परंतु, विकासाचे काम असल्याने विरोध न करता गॅस जोडण्ता मिळण्यासाठी 5600 रुपये अनामत रक्कम गुजरात गॅस कंपनीकडे जमा केली आहे.

मात्र गुजरात गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यानी गाशा गुंडाळून पोबारा केल्याची चर्चा सुरु झाली आहे. कंपनीने दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क होत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

Web Title: Bordi - Confusion about gas connection through pipeline in Jhaai village