बोर्डीत रविवारपासून वीज पुरवठा बंद

अच्युत पाटील
मंगळवार, 26 जून 2018

बोर्डी - परिसरातील वीज पुरवठा रविवार दिनांक 24 जून पासुन, बंद असल्याने संतप्त वीज ग्राहकांनी वीज वितरण कंनिच्या बोर्डी विभागीय कार्यालयात धडक मारली. परंतु, वितरण कंपनीचा एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त करून निषेध केला.

बोर्डी - परिसरातील वीज पुरवठा रविवार दिनांक 24 जून पासुन, बंद असल्याने संतप्त वीज ग्राहकांनी वीज वितरण कंनिच्या बोर्डी विभागीय कार्यालयात धडक मारली. परंतु, वितरण कंपनीचा एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त करून निषेध केला.

रविवार दिनांक 24 पासुन बोर्डी परिसरातील बोर्डी, घोलवड, जांबुगाव, अस्वाली, झाई-बोरीगाव या चार गावाचा वीज पुरवठा बंद पडला आहे. पुरवठा बंद पडण्याचे ठोस कारण स्पष्ट केले. जात नसल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. वारंवार पुरवठा खंडित होत असल्याने विजेवर चालणारी उपकरणे नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने कौटुंबिक खर्चात वाढ झाली आहे. वीज अनियमितते मुळे लघुउद्योजकांवर बेकारीचे संकट ओढवले आहे. चार दिवस वीज नसल्याने नळपाणीपुरवठा बंद झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे.

मागील महिन्याभरात वीज गायब होण्याचे प्रकार सातत्यानेहोत असल्याने वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिंन्ह उभे राहत आहे. चार वर्षापूर्वी बोर्डी येथे नविन उपकेंद्र उभारण्यात आल्यावर येथील वीज वितरण समस्या संपुष्टात येवून अखंड वीज पुरवठा केला जाईल असे कंपनीच्या अधिकाऱ्यंनी सांगितले होते. मात्र परिस्थिती बदलली आहे. भरमसाट वीज देयके आकारणी करून ग्राहकांचु लुटमार सुरु केली आहे. असा आरोपग्रामस्थ करीत आहेत. लोकप्रतिनिधी स्थानिक ग्रामस्थांच्या मुलभूत सुविधा पुरविण्या कामी उदासीन असल्याचा आरोप महिला वर्ग करू लागला आहे.

Web Title: bordi electricity supply stopped from Sunday