बोर्डी एन.बी.मेहता महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या वाढीव तुकड्यांना मिळणार मान्यता

बोर्डी एन.बी.मेहता महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या वाढीव तुकड्यांना मिळणार मान्यता

बोर्डी -  बोर्डी येथील गोखले एज्यूकेशन सोसायटीच्या एन.बी.मेहता विज्ञान महाविद्यालयात तेरावीच्या वर्गात प्रवेशापासुन वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न पंधरा ऑगस्टपर्यंत सुटणार असल्याची माहिती शिवसेनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोश शेट्टी यांनी दिली.

शासनाकडुन वाढीव तुकड्याना मान्यता मिळाली नसल्याने येथील गोखले एज्युकेशन सोसायटी संचलीत एन.बी.मेहता विज्ञान महाविद्यालयात मागिल शैक्षणिक वर्षात बहात्तर तर सुरु असलेल्या शैक्षणिक वर्षात बावन्न विद्यार्थी विज्ञान शाखेच्या तेरावीच्या प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.

प्रवेशापासुन वंचित राहिलेल्या विद्य्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी गुरुवार दिनांक 26जुलै रोजी न्याय मिळवण्यासाठी विद्यालया समोर ठिय्या आंदोलन केले होते. विद्यार्थी आणि पालकांच्या भावना लक्षात घेऊन शिवसेनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोष शेट्टी, महिला आघाडी प्रमुख वैदही वाढाण, संघटक तुषार पाटील, सुहास सावे आदी कार्यकर्त्यानी आंदोलक विद्यार्थी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा घडवून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभुमिवर संतोष शेट्टी यांनी शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेवून वाढीव तुकड्यांना मान्यता देवून प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्याविषयी निवेदन दिले.

विषयाचे गांभिर्य लक्षखत घेवून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पंधरा ऑगस्ट पर्यंत तुकड्या वाढिला मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे मान्य केले आहे. असे संतोष शेट्टी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com