वाहनतळाच्या बांधकामासाठी अवैधरित्या वाळू उपसा

अच्युत पाटील
बुधवार, 28 मार्च 2018

बोर्डी - बोर्डी ग्रामपंचायत क्षेत्रातील समुद्रकिनाऱ्यावर कोकण पर्यटन विकास महामंडळाच्या निधितून पालघर जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत वाहनतळ बांधण्यात येत आहे. या वाहनतळाच्या बांधकामासाठी अवैधरित्या वाळू उपसा करून वापरल्याचा आरोप होत आहे. तसेच जमिनिच्या मालकी वरून देखील हा वाहनतळ वादाच्या भौवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किंबहुना एक वर्षापूर्वी ग्रामपंचायतीने बांधलेली उपहारगृह देखील वादाच्या भौवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

नॅशनल इंग्लिश हायस्कूल समोरील समुद्रकिनाऱ्यावर सुमारे बाविस लाख रुपये खर्च करून पर्यटकांना सुविधा पुरविण्यासाठी सुरुची वनराई असलेल्या जमिनीवर पेव्हर ब्लॉक लावून वाहनतळ बांधण्यात येत आहे. या वाहनतळासाठी लागणारी वाळू शेजारच्या समुद्रकिनाऱ्यावरुन अवैधरित्या व रॉयल्टी न भरता काढल्याची तक्रार बहुजन विकास आघाडिचे पालघर जिल्हा संघटक शशांक पाटील यांनी केल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली आहे.

वाहनतळासाठी वापरेली जमीन सर्वे क्रमांक 514 मध्ये सातबारा उतऱ्यावर महसूल खात्याची नोंद आहे.

वाहनतळ बांधताना जमिनिचा वापर करण्यासाठी महसूल खात्याची मंजुरी घेतली होती का? वन खात्त्याने सामाजिक वनिकरण योजनेतून लावलेल्या सुरुच्या वनराई धोक्यात येणार असल्याने ग्रामपंचायत क्षेत्रात काम करताना ग्रामसभेची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न देखील या वाहनतळाबाबत उपस्थित झाला आहे.

दरम्यान, नव्याने बांधण्यात येत असलेल्या वाहनतळाशेजारी ग्रामपंचायतीने सुमारे तीन लाख रुपये खर्च करून उपहारगृहे बांधली आहेत. ती देखील महसूल खात्याच्या 514 सर्वे क्रमांकातील जमिनीवर बांधल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्णचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: bordi parking construction soil