

Citizens Protest Against SGNP Conservator
ESakal
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आज येथील अभिनव नगरातील स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या अभिनव नगर या उचभ्रू वस्तीतील नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या जागेत वनसंरक्षकांच्या आदेशानुसार सुमारे २२५० चौ.फुटांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आजच्या आंदोलनात पालिकेचे नगरसेवक राज सुर्वे यांनी केले होते.