

Tribal community attack on police in borivali
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई बोरिवली नॅशनल पार्कमधील आदिवासी समाजाकडून तीव्र आंदोलन केले जात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींना घरे रिकामी करण्यासाठी वन विभागाने नाेटिसा बजावल्या आहेत. याविराेधात राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारावर स्थलांतरित आदिवासींकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत. अशातच आता आदिवासी समाजाकडून पोलिसांवर दगडफेक केल्याची मोठी घटना घडली आहे.