Mumbai News: बोरीवलीत ‘संयमरंग उत्सव’ पार, ६४ मुमुक्षूंनी जैन दीक्षा स्वीकारली

Mumbai Jain Initiation : बोरीवलीत चिकूवाडी मैदानात ‘संयमरंग उत्सव’ पार पडला आहे. यामध्ये ६४ मुमुक्षूंनी जैन दीक्षा स्वीकारली आहे.
 64 devotees accepted Jain initiation

64 devotees accepted Jain initiation

ESakal

Updated on

मुंबई : बोरीवली पश्चिमेतील चिकूवाडी मैदानात ‘संयमरंग उत्सव’ दरम्यान ६४ मुमुक्षूंनी संसाराचा त्याग करून जैन दीक्षा स्वीकारली. हजारो भाविक आणि समाजबांधवांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभामुळे परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला. सकाळी ४ वाजल्यापासून भक्त, नातेवाईक आणि मान्यवर दीक्षार्थींना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले. अंदाजे २५ हजारांहून अधिक लोक या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार ठरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com