'बोरिवली'तील बिबट्यांना मिळाला गावचा मित्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

मुंबई - बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे रहिवासी बनलेल्या नगरच्या सूरज आणि तारा या आठ वर्षांच्या बिबट्यांना आता त्यांच्याच गावचा आणखी एक मित्र मिळाला आहे. हा नवा भिडू अवघा सव्वा महिन्याचा असल्याने त्याच्यावर विशेष कक्षात उपचार सुरू आहेत. बिबट्याची ही सर्वच पिले आईपासून दुरावल्याने या ठिकाणी संगोपनासाठी आणली आहेत.

नव्या पिलाला उपचारांसाठी गेल्या आठवड्यात बोरिवली राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याला येथे आणल्याची माहिती उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अन्वर अहमद यांनी दिली. या आधी गेल्या वर्षी 19 डिसेंबरला आईपासून दुरावलेली दोन बिबट्यांची पिले गरहून येथे दाखल झाली होती. ही पिलेही त्या वेळी सव्वा महिन्याची होती. आता त्यांचे वजन 14 किलो झाले आहे. उद्यान प्रशासनाने त्यांचे नामकरण सूरज व तारा असे केले. आता आठ महिन्यांच्या सूरज व तारा यांचे वजन 14 किलोंवर पोचले आहे. ते आठवड्यातून तीन दिवस कोंबडी, तर तीन दिवस म्हशीच्या मासांवर ताव मारतात. नगर येथे सापडलेल्या सव्वा महिन्याच्या पिलालाही येथेच पाठविण्याचा निर्णय प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. के. मिश्रा यांनी घेतला.

Web Title: boriwali leopard