'बोस' कंपनीने घेतला मोठा निर्णय, अनेकांच्या नोकऱ्या जाणार..

'बोस' कंपनीने घेतला मोठा निर्णय, अनेकांच्या नोकऱ्या जाणार..

मुंबई - स्पीकर्स, ईअरफोन्स त्याचसोबत हेडफोन्स यांसारख्या दररोज वापरल्या जाणार्‍या वस्तूंची निर्मिती करणारी कंपनी म्हणजे 'बोस' (BOSE) कंपनी. या कंपनीने आता एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. बोस कंपनी आपले सर्व रिटेल स्टोअर्स आता बंद करणार आहे. 'बोस' या कंपनीची सर्व उत्पादनं आता ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यामुळे कंपनीच्या अधिकृत रिटेल दुकानांमध्ये येणाऱ्यांची संख्या कमी झालीये. याच प्राश्वभूमीवर बोस या कंपनीने सर्व रिटेल दुकानं बंद करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. बोस कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे आता अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. 

बोस (BOSE) कंपनीबाबत 

'बोस' ही मुळची फ्रेमिंगहॅम, मॅसेच्युसेट्स म्हणजेच अमेरिकेतील कंपनी. या कंपनीने आपलं पहिलं दुकान १९९३मध्ये  सुरु केलं होतं. त्यानंतर आता संपूर्ण जगभरात त्यांची रिटेल दुकानं आहेत. मागच्या काही काळात कंपनीची रिटेल दुकानं ऑनलाइन खरेदीमुळे फारशी चालत नव्हती. त्यामुळेच कंपनीने ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्पादने खरेदी करा ऑनलाईन 

या कंपनेने आपली दुकानं बंद कारण्याचा निर्णय जरी घेतला असता तरीही 'बोस'ची सर्व उत्पादने तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येणार आहेत.  'बोस' उत्तर अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि संपूर्ण युरोपमधील आपली दुकानं बंद करणार आहे. मात्र या भागातील देशांव्यतिरिक्त म्हणजेच चीन, भारत, UAE, दक्षिण आशिया आणि दक्षिण कोरिया या देशांमधील दुकाने सुरूच राहणार आहेत. अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाईन वेबसाईट्सवर 'बोस'ची सर्व उत्पादनं उपलब्ध असतील. याचसोबत अँड्रॉइड आणि ऍपल स्टोअरवरील अधिकृत ऍपच्या माध्यमातून तुम्ही बोसची उत्पादने खरेदी करू शकता.   

दुकानं बंद झाल्याने ज्यांची नोकरी जाणार आहे, त्या कर्मचार्‍यांना कंपनीकडून दुसरी नोकरी मिळण्यासाठी मदत केली जाणार आहे. 

bose company to shut their retail stores in some parts of the world

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com