esakal | नवा दिवस नवा वाद; आदित्य ठाकरे संजय राऊतांना म्हणतात..
sakal

बोलून बातमी शोधा

नवा दिवस नवा वाद; आदित्य ठाकरे संजय राऊतांना म्हणतात..

सावरकरांच्या विरोधकांना दोन दिवस काळ्या पाण्याची शिक्षा द्या, संजय राऊत यांचा कॉंग्रेसला अप्रत्यक्ष टोला

नवा दिवस नवा वाद; आदित्य ठाकरे संजय राऊतांना म्हणतात..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत हे आपल्या वादग्रस्त विधांनांमुळे मागच्या काही दिवसांनापासून सतत चर्चेत आहेत. आधी उदयनरजे यांना छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा मागणं असो वा इंदिरा गांधींच्या करीम लाला भेटीसंदर्भाती विधान, शिवसेना खासदार संजय राऊत यांची वादग्रस्त विधानं थांबण्याचं नाव नाही. अशातच आज आज संजय राऊत आज बेळगावात आहेत. मात्र बेळगावला जाण्याआधी संजय राऊत यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. 

काय म्हणालेत संजय राऊत ?

बेळगावला निघण्याआधी संजय राऊत यांनी  "वीर सावरकरांना भारतरत्न मिळू नये असं ज्यांना वाटत त्यांना अंदमानला पाठवण्यात यावं आणि दोन दिवस काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात यावी" असं राऊत म्हणालेत. संजय राऊत यांचं हे विधान म्हणजे काँग्रेसला लागवलेला अप्रत्यक्ष टोला असल्याचं बोललं  जातंय. 


मोठी बातमी - रावसाहेब दानवेंचे जावई राज ठाकरे यांच्या भेटीला; कुरुष्णकुंजवर खलबतं.. 

एकीकडे महाराष्ट्रात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांच्या विधानांमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी दिसून येतेय. काही दिवसांपूर्वीच करीमलाला याला इंदिरा गांधी मुंबईतही पायधुमीत भेटायच्या,या त्यांच्या विधांनामुळे कॉँग्रेसच्या नेत्यांमद्धे प्रचंड नाराजी दिसून आली होती. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापुढे संजय राऊत यांचं एकही व्यक्तव्य खपवून घेणार नाही असं देखील सांगितलं होतं. अशात आज राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भडका उडताना पाहायला मिळू शकतो. 

मोठी बातमी - वाहनांसाठी आकर्षक क्रमांक.. नको रे बाबा!

राऊत यांच्या विधानावर काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

सावरकरांना भारतरत्न देण्यास ज्यांचा विरोध आहे त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात यावी असं विधान राऊत यांनी केलंय. यावर बोलताना "हे संजय राऊत यांचं वयक्तिक मत आहे, असं शिवसेना पक्ष म्हणत नाही" असं आदित्य ठाकरे म्हणालेत. "शिवसेना आणि कोंग्रेस या दोन्ही पक्षांचे संबंध चांगले आहेत, काही मुद्द्यांवर आमच्यात वेगळी मतं आहेत. पण देशात लोकशाही असल्याचं आदित्य ठाकरे म्हणलेत. 

मोठी बातमी - फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील या अधिकाऱ्यांची झालीये उचलबांगडी... ही आहेत नावे

दरम्यान पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या आणिकही एक वादग्रस्त विधांनांमुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं पाहायला मिळतंय.   

sanajay rauts indirect controversial statement on savarkar and reaction of aaditya thackeray