जास्त दराने बाटलीबंद पाणी विकणाऱ्यांविरुद्ध खटला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई - मुंबईत वानखेडे स्टेडियमवर भारत व इंग्लंड यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्याच्या वेळी छापील किमतीपेक्षा (एमआरपी) जास्त दराने बाटलीबंद पाणी विकणाऱ्यांवर वैधमापनशास्त्र यंत्रणेने खटला दाखल केला आहे. छापील किमतीपेक्षा जास्त दराने कोणत्याही पॅकबंद वस्तूंची विक्री करू नये, अशा सूचना विक्रेत्यांना देण्याचा आदेश भारतीय नियामक मंडळ व मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिला आहे, अशी माहिती वैधमापनशास्त्र नियंत्रक व विशेष पोलिस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

वानखेडे स्टेडियमवर छापील किमतीपेक्षा जास्त दराने पॅकबंद वस्तूंची विक्री होत असल्याची तक्रार वैधमापनशास्त्र यंत्रणेकडे आली होती. या तक्रारीसंदर्भात तपासणी करण्याचा आदेश विभागीय अधिकाऱ्यांना दिला होता. या तपासणीत एका विक्रेत्याने एक लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत 20 रुपये असताना ती 50 रुपयांना विकल्याचे आढळले. त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

Web Title: Bottled water at the rate of more than sailing case