esakal | मुलांच्या दाढीबद्दल 'ही' आहे मुलींची चॉईस; आधी वाचा, मग थॅक्यू बोला !
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांच्या दाढीबद्दल 'ही' आहे मुलींची चॉईस; आधी वाचा, मग थॅक्यू बोला !

मुलांच्या दाढीबद्दल 'ही' आहे मुलींची चॉईस; आधी वाचा, मग थॅक्यू बोला !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: आजकाल संपूर्ण जगभरात बिअर्ड म्हणजेच दाढी ठेवण्याचा ट्रेंड सुरु आहे. दाढी म्हणजे काही लोकांची ओळखच झाली आहे. पुरुष आणि मुलं निरनिराळ्या प्रकारची दाढी ठेवणं पसंत करतात. त्यामध्ये आता विराट कोहली स्टाईल, रणवीर सिंग स्टाईल अशा स्टाईल्सही आल्या आहेत. पुरुषांमध्ये किंवा मुलांमध्ये अशा प्रकारच्या स्टाईल्सचं प्रचंड वेड आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का, मुलींना नक्की दाढी असणारी मुलं आवडतात की दाढी नसणारी ? याबद्दल एक सर्व्हे करण्यात आलाय. यातून काय समोर आलंय पाहा. 

मुली आपला बॉयफ्रेंड मधून जेव्हा एखाद्याचा विचार करतात तेंव्हा त्या अनेक गोष्टींचा विचार करतात. यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दाढी देखील आहे बरंका. आता मुलांच्या दाढीबद्दल मुली नक्की काय विचार करतात? मुलींना दाढी असणारे मुलं आवडतात किंवा दाढी नसणाऱ्या मुलांबद्द्ल मुली काय विचार करतात? अशा काही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आम्ही आज देणार आहोत. 

धक्कादायक ! दबंगगिरी करत गेले मोबाईल शोधायला, ट्रेन आली आणि संकेतला घेऊन गेली.. 

बिअर्ड कि क्लीन शेव्ह ??

एका सर्वेक्षणातून मुलींना दाढी नसणाऱ्या मुलांपेक्षा दाढी असणारी मुलं जास्त आकर्षित करतात. दाढी म्हणजेच बिअर्ड असलेली मुलं किंवा पुरुष महिलांना आकर्षक वाटतात. ज्या मुलांना किंवा पुरुषांना दाढी आहे, अशी मुलं किंवा पुरुष मुलींना सामाजिक आणि शारीरिक दृष्ट्या जास्त सक्षम वाटतात. मुली किंवा महिलांवर अशा मुलांचा किंवा पुरुषांचा जास्त प्रभाव दिसून येतो.

या अभ्यासात १००० मुलींचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यांना त्यांच्या पार्टनरच्या चेहवरच्या दाढीबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. यात १८-७० वर्षाच्या वयोगटातल्या महिला आणि मुलींचा सहभाग होता. त्यांना ३० निरनिराळ्या पुरूषांचे फोटो दाखवण्यात आले. यात काही फोटो दाढी असणाऱ्या पुरुषांचे होते तर काही नव्हते. महिलांना यावर  ०-१०० असे गुण द्यायचे होते. यात महिलांनी दाढी असणाऱ्या मुलांना आणि पुरुषांना दाढी नसणाऱ्या पुरुषांपेक्षा जास्त प्राधान्य दिलं. त्यामुळे महिलांना किंवा मुलींना बिअर्ड असणारे पुरुष किंवा मुलं जास्त आवडतात हे यातुन सिद्ध झालं.  

सावधान ! तुमच्या होळीच्या  रंगांमध्ये बसलेत कोरोनाचे विषाणू...  

मात्र तुम्ही दाढी ठेवत नसाल तर काळजी करण्याचं काहीही कारण नाही. कारण सगळ्याच मुलींना दाढी ठेवणारे मुलं किंवा पुरुष आवडतात असं काही नाही. काही मुलींना दाढी ठेवणारे पुरुष किंवा मुलं अस्वछ आणि आळशी वाटतात. त्यामुळे त्यांना अशी मुलं आवडत नाहीत. 

boys with beard or boys with clean shave this is girls choice read full story