esakal | सावधान ! तुमच्या होळीच्या रंगात बसलाय कोरोना ?
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान ! तुमच्या होळीच्या रंगात बसलाय कोरोना ?

सावधान ! तुमच्या होळीच्या रंगात बसलाय कोरोना ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - चीनमध्ये निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून तो महाराष्ट्राच्या वेशिवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून, चिकनमध्ये कोरोना व्हायरस असल्याचे सांगत आता होळीच्या रंगातही कोरोना व्हायरस असल्याचे संदेश समाजमाध्यमांवर येत आहेत. त्यामुळे रंगाने होळी खेळायची की नाही? असा प्रश्‍न अनेक नागरिकांना सतावू लागला आहे. त्यामुळे यंदा होळीच्या सणावर कोरोना व्हायरसचे सावट असल्याचे पहावयास मिळत आहे.

मोठी बातमी - मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे काही चमत्कारिक फायदे

कोरोना व्हायरस चीनबाहेरील देशातही मोठ्या प्रमाणात पसरू लागला आहे. भारतातही त्याने शिरकाव केला आहे. त्यामुळे या जीवघेण्या आजाराची सर्वांनीच धास्ती घेतली आहे. असे असताना समाजमाध्यमांवर रोज नवनवीन अफवा पसरवल्या जात आहेत. 

काय आहे व्हायरल मेसेज - 

होळीचे कलर फुगे, आणि कलर चीन मधूनच येतात. त्यामुळे आपल्यालाही कोरोना वायरसची लागण होऊ शकते. त्यामुळे एका दिवसाच्या मजेसाठी आयुष्य धोक्‍यात घालू नका. कलर आपण पुढच्या वर्षी देखील खेळू शकतो. आपल्या प्रियजनांची काळजी आपणचं घेतली पाहीजे. म्हणून यंदा कलर पासून लांबच राहा. हा संदेश तुमच्या प्रियजनांना, मित्रांना आणि इतरांनाही पाठवणे ही विनंती. 

हा संदेश समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे होळी खेळायची की नाही याची चिंता नागरिकांना लागली आहे. याचा मोठा फटका व्यापाऱ्यांनाही बसत आहे. 

मोठी बातमी - आता 'कोरोना' तुम्हाला स्पर्श देखील करू शकणार नाही, कसा ? 'असा'...

सध्या बाजारात उपलब्ध असलेले सर्व रंग हे भारतीय बनावटीचे आहेत. मोठ्या प्रमाणात नैसर्गिक रंग आहेत. तसेच मागील दोन तीन वर्षांपासून चीनमधील रंग, पिचकाऱ्या मागवणे बंद केले आहे. मात्र सध्या समाज माध्यमांवरील कोरोनाच्या अफवांमुळे मागील वर्षीपेक्षा यंदा ग्राहकांची संख्या अतिशय कमी आहे.  । - भाविक अनावडिया, रंग विक्रेता, एपीएमसी मार्केट 

कोरोनाबाबत अफवा येत असल्या तरी नवी मुंबईत कोरोना संशयित आढळून आलेला नाही. असे असले तरी या आजाराशी मुकाबला करण्यासाठी मनपा आरोग्य विभाग पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे.  । - बाळासाहेब सोनवणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई महापालिका  

holi celebrations fear of corona and fake viral messages read