ब्राह्मण समाजाचे मुंबईत आरक्षणासाठी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

मुंबई - ब्राह्मण समाजातील गरिब कुटुंबांना आर्थिक मदतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, तसेच आरक्षित उमेदवारांना खुल्या वर्गातून अर्ज करण्यास मज्जाव करण्याची प्रमुख मागणी करत ब्राह्मणांच्या २४ संघटनांनी आज मुंबईत आंदोलन केले. 

ब्राह्मण समाजावर व ब्राह्मण महापुरुषांवर होणारी जातीय चिखलफेक थांबविण्यासाठी कायदा करा, ब्राह्मण समाजाला तात्काळ आरक्षण द्या, ब्राह्मणांच्या मुलांना ‘केजी’ ते ‘पीजी’ मोफत शिक्षण द्या, अशा मागण्या करत हजारो ब्राह्मणांनी आज आझाद मैदानात धडक दिली. मोर्चेकऱ्यांमध्ये मराठवाडा व विदर्भातील तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. 

‘जय परशुराम’, ‘ब्राह्मण हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा,’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. ब्राह्मण पुरोहितांना महिन्याला पाच हजार रुपये मानधन द्यावे व त्यांची विविध मंदिरांत नियुक्ती करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

Web Title: Brahman Society Agitation for Reservation