एसटीसाठी ब्रेक डाऊन व्हॅन

एसटीसाठी ब्रेक डाऊन व्हॅन

मुंबई:  रस्त्यावर धावणाऱ्या खिळखिळ्या आणि भंगार एसटी बंद पडल्यास त्याला आगारात पोचवण्यासाठी एसटी महामंडळाने १०० ब्रेक डाऊन व्हॅन नवीन विकत घेतल्या असून, दोन टप्प्यात ४५ व्हॅनचे राज्यातील आगारांमध्ये वाटप करण्यात आले.

राज्य परिवहन महामंडळात सुमारे १८ हजार ५०० गाड्या आहे. यातील जास्तीत जास्त गाड्या भंगारात असून काही गाड्या खिळखिळ्या अवस्थेत रस्त्यावर धावत आहेत. प्रवाशांची वाहतूक करताना गाड्यांमध्ये बिघाडाच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ब्रेक डाऊनचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांना या ब्रेक डाऊनमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 
इंटरनेट नेटवर्क नसलेल्या ठिकाणी प्रवाशांची गाडी बंद पडल्यास संपर्क होत नसल्याने, अशा बिघाड होणाऱ्या गाड्यांना आगारात पोहचवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विविध आगारांमध्ये ब्रेक डाऊन व्हॅन वितरीत करण्यात आल्या आहेत. 

तिसऱ्या टप्प्यातही वाटप
राज्यात अनेक आगारातील ब्रेक डाऊनची संख्या वाढल्याने अशा आगारांकडून अहवाल मागविण्यात आले आहेत. त्यानंतर पुन्हा तिसरा टप्पा काढण्यात येणार असून, त्या आगारांनासुद्धा ब्रेक डाऊन व्हॅन देण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन प्रवासात एसटी बंद पडल्यास प्रवाशांचा त्रास वाचवण्यासाठी मदत होणार असून, त्याशिवाय रस्त्यावरील बिघाड झालेल्या गाडीला आगारात आणून योग्य दुरूस्ती करता येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com