esakal | मुंबईच्या मोबिलीटी आराखड्याला ब्रेक; सुधारित अर्थसंकल्पात संपुर्ण तरतूद रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईच्या मोबिलीटी आराखड्याला ब्रेक; सुधारित अर्थसंकल्पात संपुर्ण तरतूद रद्द

फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाने अर्थसंकल्प 48 कोटी रुपयांची तरतूद केली होती. ही तरतूद सुधारीत अर्थसंकल्पात 100 टक्के रद्द करण्यात आली आहे.

मुंबईच्या मोबिलीटी आराखड्याला ब्रेक; सुधारित अर्थसंकल्पात संपुर्ण तरतूद रद्द

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : कोव्हिडमुळे मुंबईचा गमनशिलता आराखडा (मोबिलीटी प्लान ) रखडणार आहे. शहरातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी 2017 मध्ये तयार झालेल्या कृती आराखड्यानुसार मुंबईतील पाच बॉटल नेक मध्ये रुंदीकरण करुन मिसींग लींक जोडण्याचे काम या वर्षी हाती घेण्यात येणार होते. मात्र,त्यासाठी फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाने अर्थसंकल्प 48 कोटी रुपयांची तरतूद केली होती. ही तरतूद सुधारीत अर्थसंकल्पात 100 टक्के रद्द करण्यात आली आहे.

म्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधी यांनीच ठरवायला हवेः शिवसेना

मुंबईतील वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी भविष्यातील वाहतुकीची गरज ओळखून रस्ते रुंदीकरण,उड्डाण पुल तसेच सार्वजनिक वाहतुकीसाठी महानगर पालिकेने कृती आराखडा तयार केला होता. या कृती आराखड्यात मुंबईतील 41 किलोमिटरच्या मिसींग लिंक जोडून रस्त्यांच्या बॉटल नेक भोवती होणारी वाहतुक कोंडी फोडण्याचा निर्णय घेतला होता. यातील सुमारे 10 किलोमिटरच्या मिसींग लिंक जोडण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात स्थायी समितीत सादर झालेल्या अर्थसंकल्पात 48 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र,ऑगस्ट महिन्यात पालिकेच्या महासभेत मंजूर झालेल्या सुधारीत अर्थसंकल्पात 2 हजार 500 कोटी रुपयांची कपात करण्यात आली. त्यात, बॉटल नेकच्या रुंदीकरणासाठी असलेली 48 कोटी रुपयांची तरतूद पुर्ण पणे रद्द करण्यात आली.लॉकडाऊन मुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झालेली असल्याने अर्थसंकल्पात कपातीचा निर्णय घेतला आहे.

यापुर्वीच्या अर्थसंकल्पात याच कामासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, तेव्हाही एक पैशाचे काम झाले नव्हते.यंदा महापालिकेने या रुंदीकरणासाठी पालिकेने प्राथमिक प्रक्रिया पुर्ण केली होते. या प्रकल्पग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यापासून रुंदीकरणातील अडथळे कसे दुर करता येतील याचा आढावा घेण्यात आला होता. त्यामुळे यंदा प्रत्यक्ष काम सुरु होण्याची शक्‍यता होती.

मुंबईतील हरित कवच कमी झाल्याने पूर परिस्थिती; 'स्प्रिंगर नेचर मुंबई'चा अहवाल

या मिसींग लिंक जोडणार होत्या
शिव रुग्णालयाच्या बाजून कृष्णा मेमन मार्गावरुन पुर्व उपनगरातून धारावी मार्ग थेट माहिमला अथवा वांद्रे येथे जाता येते. त्यामुळे हा महत्वाचा मार्ग असल्याने या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. तर, विक्रोळी फाटक येथे पुर्व पश्‍चिम जोडणारा उड्डाण पुल तयार होत असल्याने तेथे भविष्यात वाहतुक वाहतुक वाढणार आहे. त्यामुळे पिरोजशा मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार होते. तसेच, मुलूंड येथील फाटक पुला पर्यंत येणाऱ्या मार्गाचे रुंदीकरणही महत्वाचे होते. गोरेगाव मुलूंड लिंक रोड सुरु झाल्यानंतर या भागात वाहतुक वाढणार होती. त्यामुळे या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता.

कोरोनाच्या भीतीने वाफ देण्याच्या मशीनला मागणी वाढली; रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचा दावा 

काय आहे मोबिलीटी प्लान
मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 40 लाखा पर्यंत पोहचेल असा अंदाज असून तर 80 लाख नोकरदारांची रोज मुंबईत वर्दळ असेल असा अंदाज आहे. त्यावेळच्या गर्दीनुसार मुंबईतील रस्ते,सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी महानगर पालिकेने खासगी सल्लागाराच्या मदतीने हा आराखडा तयार होता. त्यात,नवे उड्डाणपुल,बेस्ट बसेस साठी स्वतंत्र मार्गिक,मिसींग लिंक जोडणे,रस्तांचे रुंदीकरण अशी शिफारशी केल्या होती.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )