
मुंबई: मुंबई शहर अपघाताचे शहर ठरले आहे. 2019 मध्ये देशातील 53 मोठ्या शहरात झालेल्या विविध अपघातात 61,404 लोक दगावले. पैकी 9,246 मृत्यू एकट्या मुंबई शहरात झालेत. नॅशनल क्राईम ब्युरोच्या ताज्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. रेल्वे अपघातातही महाराष्ट्र पुढे आहे.
2019 मध्ये देशातील 53 शहरात एकूण 69,064 अपघात झाले. यामध्ये 59,070 जणांचा मृत्यू झाले. यापैकी 15 टक्के मृत्यू मुंबई शहरात झाले. मुंबईत सर्वाधिक 9,246 जण ठार झाले तर त्यानंतर दिल्लीत 4,516, बंगळुरुमध्ये 4016 जणांचा मृत्यू झाला.सर्वाधिक मृत्यू झालेल्या शहराच्या यादीत चौथा क्रमांकावर पुण्याचा नंबर लागतो. पुण्यात 3,946 जण विविध अपघातात ठार झालेत.
मुंबईतील 9,246 मृत्यूपैकी 9212 जण ट्राफीक आणि अचानक झालेल्या घटनेत ठार झालेत. मृत्यूमूखी पडलेल्यांची संख्या 9212 एवढी आहे. मुंबईत अपघाती मृत्यू झालेल्यांमध्ये 14 वर्षाखालील मुलांची संख्या 595 एवढी होती. तर 145 जण 14 ते 18 या वयोगटातील आहे. 1167 जण 18 ते 30 या वयोगटालीत तर 20 ते 45 च्या दरम्यान असलेल्यांची संख्या होती 2485. अपघातात ठार झालेल्यामध्ये सर्वाधिक संख्या म्हणजे पुरुषांची होती.
देशात सर्वाधिक अपघाताचे प्रमाण असलेल्या शहरामध्ये राज्यातील चार शहरांचा समावेश आहे. 53 मोठ्या शहरांमध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण 38.2 टक्के आहे. तर राष्ट्रीय अपघाताची प्रमाण 31.5 टक्के आहे. सर्वाधिक अपघाताचे प्रमाण राजकोट (99.3), त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर नाशिकचा नंबर लागतो. नाशिकमध्ये अपघाताचे प्रमाण 99.0 टक्के आहे. तर वसई विरारमध्ये अपघाताचे प्रमाण 92.1 टक्के, औरंगाबादमध्ये 87.1 टक्के एवढे आहे. रस्ते अपघातात महाराष्ट्राचा सहावा नंबर लागतो. मात्र अपघातात बळींच्या संख्येत राज्याचा देशातून दुसरा क्रमांक लागतो. हि चितांजनक बाब आहे.
राज्यात सर्वाधिक रेल्वे अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 2019 मध्ये एकुण 27,987 रेल्वे अपघाताची नोंद झाली. यापैकी राज्यात 6,338 रेल्वे अपघात झाले. या रेल्वे अपघातात 24,619 जण ठार झाले. त्यामध्ये महाराष्ट्रात 3,916 मृत्यू नोंदवल आहेत. महाराष्ट्रात संध्याकाळी 6 ते 9 दरम्यान या वेळेत सर्वाधिक रेल्वे अपघात झालेत.
Breaking News Mumbai has become a city of accidents
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.