विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमीः विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देता येणार

पूजा विचारे
Thursday, 3 September 2020

विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देता येणार आहे. या प्रस्तावास राज्यपालांनी परवानगी दिली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावणं विद्यापीठांना बंधनकारक असणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

मुंबईः उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी दिली. विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देता येणार आहे. या प्रस्तावास राज्यपालांनी परवानगी दिली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावणं विद्यापीठांना बंधनकारक असणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

१५ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत प्रॅक्टिकल परीक्षा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच विद्यापीठे परीक्षांच्या तारखा जाहीर करणार असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून परीक्षांना सुरुवात होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

 

सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे बंधनकारक झाले आहे. त्यानंतर आज अंतिम वर्ष परिक्षेबाबत महत्वाची बैठक पार पडली.  विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सोप्या पद्धतीनं घेण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकारात्मक असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली होती. अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत कुलगुरूंचे अहवाल, विद्यार्थी प्रतिनिधी आणि संघटनांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी उदय सामंत यांनी बुधवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली होती. 

हेही वाचाः मुंबईतील कोरोना रूग्णांच्या मृत्यूमागे `ही` बाब ठरतेय कारणीभूत; नागरिकांकडून अद्यापही होतंय दुर्लक्ष

यावर्षी परीक्षा सोप्या पद्धतीनं होणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं.  प्रॅक्टिकल परीक्षा सुद्धा फिजिकली करण्यास लागू नये, अशी पद्धत अवलंबणार असल्याचं सामंत यांनी म्हटलं. कुलगुरूंचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्यावे, समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशा सूचना राज्यपालांनी केल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान विद्यार्थ्यांनी मनात कुठलाच संभ्रम न ठवेता अभ्यासाला लागावं
उर्वरित बाबींवर आज रात्रीपर्यंत निर्णय घेऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे. आज अहवाल फायनल करुन उद्या दुपारपर्यंत परीक्षा पद्धती कशा घ्यायच्या यावर पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं.  ऑनलाइन परीक्षांबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह गरीब विद्यार्थ्यांसमोर नेटवर्क आणि संसाधनांच्या समस्या आहेत. त्यावर सोप्या पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत चर्चा सुरू आहे.

अधिक वाचाः  किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 'फोर्ट फाऊंडेशन' उभारणार, छत्रपती संभाजी राजेंकडून घोडबंदर किल्ल्यांची पाहणी

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय करायचं याबाबतही आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. राज्यपाल आणि आमच्यामध्ये विसंगती नाही. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय करायचं याबाबतही आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ, असंही ते म्हणाले.

Students will be able to take the exam at home uday samant


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students will be able to take the exam at home uday samant