Breaking : मुंबईच्या ताज हॉटेलला दहशतवादी हल्ल्याचा धमकीचा फोन... यंत्रणा अलर्ट

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 30 जून 2020

ताज हॉटेलला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

 

मुंबई- ताज हॉटेलला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे.  अज्ञातांनी हॉटेलमध्ये फोन करुन दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समजतेय. या धमकीच्या फोननंतर मुंबई पोलिसांनी ताज हॉटेलच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

सोमवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीनं फोन करुन ही धमकी दिली आहे. पुन्हा एकदा ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार, हा धमकीचा फोन पाकिस्तानमधून आल्याचं समजतंय. या फोननंतर मुंबई पोलिसांकडून ताज हॉटेलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हॉटेलसह मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईत पेट्रोलिंग आणि नाकाबंदी यातही वाढ केली आहे. 

ठाण्यातील लॉकडाऊनबाबत सावळा गोंधळ, पोलिस आणि महापालिकेत समन्वय नाही का ?

कोस्टल पेट्रोलिंगमध्येही वाढ करण्यात आल्याचं समजतंय. कारण जेव्हा 26/11 ला ताजवर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हा दहशतवादी समुद्राच्या मार्गानं मुंबईत आले होते. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कोस्टल पेट्रोलिंग सुद्धा वाढवली आहे. तसंच पोलिसांनी नेव्ही आणि कोस्ट गार्डला या कॉलचा अलर्टही दिला आहे. 

हॉटेलमध्ये अशा प्रकारचा कॉल येताच हॉटेलच्या मॅनेजन्मेंट याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी एटीएस, महाराष्ट्र पोलिस यांना कळवण्यात आलं असून या कॉलचा तपास केला जात आहे. पोलिस आणि एजन्सी हा कॉल खरंच पाकिस्तानमधून आला आहे की कोणी चेष्टा केली आहे याचा तपास करत आहेत.

मुंबईत वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच; तब्बल 'इतकी' वाहनं केली जप्त..

कालच पाकिस्तानच्या कराचीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी या कॉलचं गांभीर्य बघून तपास सुरु केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking: Terrorist phone threat to Mumbai's Taj Hotel ... system alert

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: