मुंबईत वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच; तब्बल 'इतकी' वाहनं केली जप्त..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

मुंबईतील विविध पोलिस ठाणे व वाहतुक पोलिसांनी सुरू केलेली कारवाई सोमवारीही सुरू ठेवली.

मुंबई: मुंबईतील विविध पोलिस ठाणे व वाहतुक पोलिसांनी सुरू केलेली कारवाई सोमवारीही सुरू ठेवली. त्या अंतर्गत दोघांनीही मिळन 14 हजार 691 गाड्या जप्त केल्या. त्यातील  8611 वाहने वाहतुक पोलिस, तर 6080 वाहने विविध पोलिस ठाण्यात अंतर्गत लावण्यात आलेल्या  नाकांदीमध्ये जप्त करण्यात आल्या आहेत.

लॉक डाऊन काळात विना कारण रस्त्यावर वाहन घेऊन निघणाऱ्यावर सोमवारीही विशेष मोहिम चालवण्यात आली.त्या अंतर्गत मुंबईतील 180 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती.

 हेही वाचा: बेस्ट कामगारांवर बडतर्फीची टांगती तलवार; 'इतक्या' कामगारांना बेस्ट प्रशासनाने बजावल्या नोटिसा.. 

त्याच्या पाठोपाठ दक्षिण मुंबईतील कुलाबा, मरीन ड्राईव्ह परिसरातून 875, गिरगाव परिसरातून 654, नागपाडा-वरळी परिसरातून 392, दादर, धारावी परिसरातून 159, दादर पूर्व-माटुंगा-परळ परिसरातून430, चेंबूर, मानखुर्द येथन 1138, घाटकोपर ते मुंलुड परिसरातून 1823, सांताक्रुझ-वाकोला परिसरातन 187, तर वांद्रे पश्चिम ते सांताक्रुझ परिसरातून 582, अंधेरी व परिसर 461, बोरीवली व परिसर 389 व दहिसर व परिसरातून 418 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबईतीली वाढत्या कोरोना संकटानंतरही नागरीक घरातून विनाकारण बाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या वाहन चालकांविरोधात रविवारी विशेष मोहिम राबवली.

हेही वाचा: बापरे! मुंबई विभागात तब्बल 'इतक्या' एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा; वाचा सविस्तर बातमी..

 

याशिवाय वाहुतक पोलिसांनीही मुंबईत वाहनांविरोधात विशेष मोहिम राबवली.  अत्यावश्यक कारण नसतानाही वाहने बाहेर काढणा-या वाहन चालकांवर ही कारवाई करण्यात आली. त्यातील 474 तीन चाकी, 295 टॅक्सी, 1601 कार, व 6241 दुचाकी वाहनांचा समावेश आहे.

traffic police Confiscated 14 thousand vehicles 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic police Confiscated 14 thousand vehicles