Mumbai News : ‘ब्रिक्स’मधील व्यावसायिक सहकार्याला नवी दिशा; ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम-२’चे पाच-सहा सप्टेंबरला मुंबईमध्ये आयोजन

महाराष्ट्र सरकार तसेच ‘ब्रिक्स युथ अलायन्स’ यांच्या भागीदारीत हॉटेल ताजमहाल पॅलेसमध्ये पाच व सहा सप्टेंबर रोजी एपी ग्लोबाले आयोजित ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम - २’ हा कार्यक्रम होत आहे.
global impact forum-2 reporter conference

global impact forum-2 reporter conference

sakal

Updated on

मुंबई - ब्रिक्स देशांमधील सांस्कृतिक, व्यावसायिक सहकार्य जपतानाच स्पर्धा न करता हे सहकार्य वाढवणे हा ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम - २, सिव्हिलायझेशन लेगसी,’ चा उद्देश आहे असे ‘एपी ग्लोबाले’च्या संचालक जान्हवी पवार यांनी आज येथे सांगितले.

महाराष्ट्र सरकार तसेच ‘ब्रिक्स युथ अलायन्स’ यांच्या भागीदारीत हॉटेल ताजमहाल पॅलेसमध्ये पाच व सहा सप्टेंबर रोजी एपी ग्लोबाले आयोजित ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम - २’ हा कार्यक्रम होत आहे. याबाबत आजच्या पत्रकार परिषदेला रशियाचे येथील उपमहावाणिज्यदूत अलेक्झांडर फुरसॉव्ह, उपवाणिज्यदूत मातेव्ही फेटीसोव्ह, ‘व्ही सी ग्रीड फाउंडिंग टीम’चे वंश देसाई आदी उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com