आदेश धुडकावून त्यांनी लावलं लग्न! पुढे काय झालं वाचा तुम्हीच...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 March 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लग्न समारंभ व इतर गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे आदेश दिले असतानाही उरणच्या धुतूम गावातील नारायण ठाकूर यांनी आपल्या मुलीचे लग्न समारंभाचे आयोजन केल्याचे आढळून आले. त्यामुळे उरण पोलिसांनी नारायण ठाकूर यांच्याविरोधात मनाई आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. 

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लग्न समारंभ व इतर गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे आदेश दिले असतानाही उरणच्या धुतूम गावातील नारायण ठाकूर यांनी आपल्या मुलीचे लग्न समारंभाचे आयोजन केल्याचे आढळून आले. त्यामुळे उरण पोलिसांनी नारायण ठाकूर यांच्याविरोधात मनाई आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. 

ही बातमी वाचली का? धक्कादायक! रक्षकच बनताय कोरोनाचे भक्षक

कोरोना विषाणूचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी सर्व प्रकारचे शासकीय उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम, प्रशिक्षण, मोर्चे, धरणे आंदोलन व इतर गर्दीच्या कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत परवानगी देण्यात येऊ नयेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच नवी मुंबई पोलिसांनीदेखील कायदा व सुव्यवस्था रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केले आहेत. यामध्ये ज्या ठिकाणी लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे, अशा आयोजकांना फौजदारी नोटीस बजावून लग्न समारंभ पार करू नये, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. असे असतानाही धुतूम गावातील नारायण गजानन ठाकूर यांच्या मुलीचा लग्न समारंभ गुरुवारी (ता. 19) सायंकाळी उरणच्या जासई गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सुरू असल्याचे आढळून आले. उरण पोलिसांनी प्रत्यक्ष लग्न समारंभाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, या लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी नारायण ठाकूर यांच्यावर कलम 188 नुसार तसेच मुंबई पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. 

ही बातमी वाचली का? कोरोनाच्या संकटामुळे गृह खरेदीवर मंदीची छाया

पोलिसांनी बजावली होती नोटीस 
नारायण ठाकूर यांच्या मुलीचा लग्न समारंभ गुरुवारी होणार होता. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या आदेशाप्रमाणे उरण पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती; मात्र ठाकूर यांनी या नोटिशीला न जुमानता तसेच कोणतीही परवानगी न घेता मुलीचा लग्न समारंभ गर्दीत पार पाडून शासकीय आदेशाचा भंग केल्याचे आढळून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bride's father commits crime by disobeying government orders