कोरोनाच्या संकटामुळे गृह खरेदीवर मंदीची छाया

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

कोरोनाच्या संकटामुळे गुढीपाडव्याला गृहखरेदीवर मंदीचे सावट राहण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी सरकारने सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे गुढीपाडव्याला गृहखरेदीवर मंदीचे सावट राहण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी सरकारने सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

ही बातमी वाचली? मुंबई, नवी मुंबईचे प्रदुषण एका दिवसात निम्म्याने घटले

नोटाबंदी, रेरा, जीएसटी, बॅंकिंग व बिगरबॅंक वित्तसंस्थांना बसलेले हादरे या कारणांमुळे काही वर्षांपासून बांधकाम व्यवसाय रडतखडत सुरू होता. काही महिन्यांपासून तो सावरण्याची शक्‍यता दिसत होती; परंतु दीड-दोन महिन्यांत त्याचे कंबरडे मोडल्याची भीती व्यावसायिक व्यक्त करत आहेत. निवासी प्रकल्पांवर मंदीची छाया आहे; व्यावसायिक वापराच्या प्रकल्पांबाबतही ‘थांबा आणि वाट पाहा’ धोरण खरेदीदार स्वीकारत असल्याचे बोलले जात आहे.

ही बातमी वाचली? चिंताजनक, माहाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवे बुकिंग आणि गृहप्रवेश होतात; मात्र यंदा चित्र वेगळे दिसते. आता आता ग्राहक या क्षेत्राकडे परतू लागले होते; त्यात कोरोनाचा स्पीडब्रेकर आडवा आला आहे, अशी प्रतिक्रिया असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केली.

दीर्घकालीन परिणाम अज्ञात
व्यावसायिक संकुलांसाठी मागणी कायम आहे; मात्र आता प्रवासबंदीमुळे प्रत्यक्ष खरेदीचे निर्णय लांबणीवर पडत आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात गृहनिर्माण क्षेत्रावर परिणाम होतील, असे मत नाईट फ्रॅंक इंडिया या रिअल इस्टेट क्षेत्रातील सल्लागार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी व्यक्त केले. या संकटाचा फटका किती बसेल, हे आताच सांगता येत नाही, असेही ते म्हणाले. 

ही बातमी वाचली? सगळीकडे शुकशुकाट! मात्र, या बाजारात तुडूंब गर्दी 

गृहनिर्माण क्षेत्र आणि त्याच्याशी संलग्न असलेले वेगवेगळ्या अडीचशे उद्योगांत देशात दुसऱ्या क्रमांकाची रोजगारनिर्मिती होते. या क्षेत्रासाठी सवलती सरकारने जाहीर कराव्यात. 
- डॉ. निरंजन हिरानंदानी, अध्यक्ष, असोचेम.

गेल्या काही तिमाहींमध्ये गृहनिर्माण क्षेत्रासमोर आशादायक चित्र होते; मात्र आता ही गती कमी होईल. नागरिकांवरील निर्बंध आणि अन्य कारणांमुळे घरांची विक्री कमी होईल.
- अशोक मोहनानी, उपाध्यक्ष,  नरेडको.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona crisis shadows recession on home buying